रविवार, ८ एप्रिल, २०१२

भुलेश्वर ( गिरगाव चौपाटी जवळ)

ही शान कोणाची ? लालबागच्या राजाची '... ' लालबागच्या राजाचा विजय असो ,' या भावपूर्ण घोषणांनी परिसर दणाणला होता... झांजपथक आणि कोंबडी बाजा या वाद्यांचा अनोखा मिलाफ... टाळ मृदुंगाचा गजर... डौलाने फडकणारा मूषकध्वज... अशा राजेशाही थाटात लाखो भक्तांच्या गदीर्तून वाट काढणाऱ्या ' राजा ' च्या दर्शनाने भक्तांचे हात आपोआप जुळत होते. कोंबडी बाजा अधिक प्रिय असलेल्या ' राजा ' च्या मिरवणुकीत वाद्याची सलामी देण्याची संधी कोल्हापूरच्या झांजपथकाला मिळाली होती. त्याने भक्तांची मने जिंकली. तो गजर ऐकता ऐकता कोणी राजाचे देखणे रूप डोळ्यांत साठवत होते , तर कुणी मोबाइलच्या कॅमेऱ्यात... मिटल्या डोळ्यांनी कोणी वरदान मागत होते , तर कोणी खांद्यावर घेतलेल्या चिमुरड्यांसाठी साकडे घालत होते... आपली सेवा ' राजा ' च्या चरणी रुजू करण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू होती. प्रसादातून ' राजा ' चा आशीर्वाद मिळवण्यासाठी हजारो हात एकाच वेळी उंचावत होते. लालबाग ते गिरगाव या १८ तासांच्या प्रवासानंतरही मिरवणुकीत ना उत्साह कमी झाला , ना जयकारातला जोश खालावला. पण जसजसे निरोपाचे ठिकाण जवळ आले , तसतशी भक्तांची पावले जड होत गेली... 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा