रविवार, ८ एप्रिल, २०१२

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, आपल्या महाराष्ट्रच आराध्य दैवत म्हणजे गणपती....भाद्रपद चतुर्दशीला संपूर्ण जगभरात बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करून गणेश चतुर्दशी साजरी केली जाते..या काळात सगळीकडे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असते...काही बाप्पा गणेश चतुर्दशी नंतर अवघ्या दुसऱ्यांच दिवशी आपला निरोप घेतात...तर काही बाप्पा तब्बल २१-२१ दिवस आपल्या भक्तांना आशीर्वाद देत असतात...जगभरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणातसाजरा होणारा एकच ठिकाण म्हणजे आपली मुंबई...सणांच माहेरघर समजली जाणारी मुंबई गणेशोत्सवाच्या काळात अगदी फुलून जाते..मुंबईत जागोजागी हजारो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, डोळे दिपवून टाकणारी विदुयत रोषणाई,भक्तांची गर्दी,उत्साह,आनंद,बाप्पाच्या नावाचा गजर अस चित्र आपल्याला पाहायला भेटते...
आपल्या या धकाधकीच्या जीवनात आपल्या मनात मुंबईतील सर्व गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन बाप्पाच दर्शन घ्यायची प्रचंड इच्छा असूनही आपल्याला हि गोष्ट साध्य करता येत नाही..म्हणूनच आपल्याला गणेशोत्सवाच्या काळातच नाही तर पूर्ण वर्षभर आपल्या मुंबईतील लाडक्या बाप्पाच दर्शन घडवून देण्यासाठी "मुंबई गणपती फेसबुक पेज " तर्फे हा छोटासा प्रयत्न...तुम्ही आमच्यावर असच प्रेम करत राहावे हीच श्री गजाननाकडे प्रार्थना !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा