रविवार, ८ एप्रिल, २०१२

| | श्री चिंतामणी प्रसन्न | |


मनातील चिंता हरतो तो चिंतामणी

'चिंता' मानवी जीवनाला लागलेले सर्वात मोठे ग्रहण
या ग्रहणातच माणूस 'पौर्णिमा' आणि 'अमावास्यांचे' भ्रमण करीत असतो.

'चिंता' हा शब्द नर आणि नारी आपल्या जन्माबरोबर घेऊन येतो. शेवट एवढा भयंकर की, या चिंतेचे रुपांतर चितेवर होवून जाते.
म्हणूनच या भयाण समस्येला नेस्तनाबूत करण्यासाठी साकडं घालीत आहोत साक्षात चिंतामणीला !

'चिंता' या समस्येचे निवारण मनाशी आणले तर सहज होवू शकते.
केवळ शोध म्हणजे सापाडेल ही वृत्ती मनाशी असायला हवी.
'चिंता' ही वाईट, तिचे पिक फार झपाट्याने वाढते.
वेगवेगळ्या स्तरात, वेगवेगळ्या रुपात, ती तुमच्या बरोबर असते.
तिची कारणे अनंत आहेत. आप्तसंबंधात, संसारात, उद्योगधंद्यात, कलेत, समाजकार्यात , राजकारणातही. . . .
जिथे जिथे तुमचा वावर आहे तिथे तिथे ती तुमच्या सोबत.

म्हणूनच ज्या क्षणी 'चिंता' येते. त्याचक्षणी तिची मोड खुडून खाढवा, मनाचा वेध घेवूनच तिचा अंकुर काढून टाकावा. . . . !

आयुष्यात, भविष्यात जे होणार ते होताच असते !
त्यासाठी 'चिंता' करून काय उपयोग ?
'चिंता' या वार्धक्याला उत्तर चिंतनानेच दया !
६४ कलांच अधिपती साक्षात विश्व विधात्या 'चिंतामणीच्या' चरणी लीन होवून श्रींच्या चिंतनातच आपले मं गुंतवा.
प्रपंच आणि पारमार्थ या दोन्ही गोष्टी साक्षात
'चिंतामणीच्या' इच्छेनेच चालतात !
'चिंता' दूर करण्यासाठी प्रयातांची पराकाष्टा तर जरूर कराच,
पण त्या हि पुढे 'श्रीं'च्या चरणी मात्राजारून लीन व्हा !
कारण 'श्रीं'च्या कृपेनेच प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे.
चिंतेचे निवारण होणार आहे, 'श्रीं'चे चिंतन केल्यानेच !
'श्रीं'चे चिंतन केल्यास 'चिंता' नाहीशी होवून प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीत अनुकुलता प्राप्त होऊनच मानवी जीवनात धन्यता प्राप्त होते.

हेच त्रिवार सत्य आहे की
'चिंता' या शापापासून मुक्त होण्यासाठीच
'चिंचपोकळीचा चिंतामणी' अवतरला आहे.
लक्षात असुद्या 'चिन्त' हरतो तोच 'चिंतामणी' !
चला श्राध्दापुर्वक बोलूया माझा चिंतामणी ! मी चिंतामणीचा !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा