रविवार, ८ एप्रिल, २०१२

गणेशमूर्ती च्या प्राणप्रतिष्ठेला सुरुवात करण्यापूर्वी.... 

कुठल्याही मंगलकार्याला सुरुवात करताना विघ्नहर्त्या श्रीगणपतीची पूजा व आराधना करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. श्रीगणेशचतुर्थीच्या दिवशी सकाळी मंगलस्नान करावे, पूजादी नित्यविधी करावेत. घरच्या देवांना, सर्व ज्येष्ठ व्यक्तींना आणि ब्राह्मणाला नमस्कार करून कुलदेवतेचे स्मरण करून पूजेला सुरुवात करावी. 
रांगोळी काढून त्यावर पाट ठेवून मूर्ती स्थापन करावी आणि मग आचमन, प्राणायाम या विधींनी पूजेला सुरुवात करावी. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा